Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारचा फैसला मंगळवारी

देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारचा फैसला मंगळवारी

Devendra Fadnavis, Ajit Pawar government's decision on Tuesday  supreme court दिल्ली : राज्यातील सत्तेचा पेच कायम आहे. भाजपानं गुपचूप सरकार स्थापन करून सर्वांना धक्का दिला. या घटनेनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीनं थेट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावली. या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली, आज सोमवारी सत्तास्थापनेच्या निर्णयासंदर्भातील कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. यावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला आहे. यासंदर्भात न्यायालय उद्या सोमवारी निर्णय सकाळी १०.३० वाजता देणार आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार राज्यात येणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं राज्याच्या राजकारणला वेगळीच राजकीय कलाटणी मिळाली आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांनी दिलेल्या धक्क्यानंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षाला सावरण्यासाठी सरसावले असून काही आमदार राष्ट्रवादीकडे परतले आहेत. तर, भाजप बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे.

काय मांडण्यात आले मुद्दे….

३ वकील एकाच याचिकेवर युक्तिवाद करत आहेत; मुकूल रोहातगी यांचा आक्षेप

सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदारांना हंगामी अध्यक्ष बनवा; तातडीने बहुमत चाचणी घ्या: अभिषेक मनु सिंघवी (राष्ट्रवादीचे वकील)

या याचिकेची कार्यकक्षा मर्यादित आहे; पण दोन्ही पक्ष याला विनाकारण वाढवत आहे : न्यायमूर्ती खन्ना

बहुमत चाचणी तात्काळ घेण्यात यावी: कपिल सिबल

राज्यपालांनी पत्राच्या आधारे निर्णय घेतला : न्यायमूर्ती

तुम्ही राष्ट्रपती राजवट उठवण्याला आव्हान दिलेलंच नाही: मुकूल रोहतगी (भाजप वकील)

पहाटे ५.१७ वाजता राष्ट्रपती राजवट उठवण्याची आणि ८ वाजता शपथ घेण्याची इतकी घाई का?: कपिल सिबल

राज्यपाल आणि फडणवीसांच्या भेटीनंतर पहाटे राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली: कपिल सिबल

संध्याकाळी पत्रकार परिषद झाल्यावर पहाटे ५ वाजता फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतली: कपिल सिबल

२२ नोव्हेंबरला पत्रकार परिषद होऊन ठरलं की तिन्ही पक्ष सोबत आहेत, त्याची घोषणाही झाली: कपिल सिबल

शिवसेनेकडून वकील कपिल सिबल यांचा युक्तिवाद सुरु

मुख्यमंत्र्यांना सविस्तर उत्तर देण्यास २ ते ३ दिवसांचा वेळ मिळायला हवा : मुकूल रोहतगी (भाजप वकील)

कोणत्याही अंतरिम आदेश या प्रकरणी देऊ नये: मुकूल रोहतगी (भाजप वकील)

बहुमत राजभवनात सिद्ध होत नाही तर विधानसभेत सिद्ध होतं: सुप्रीम कोर्ट

विश्वासदर्शक ठरावानंतरच बहुमत सिद्ध होईल: सुप्रीम कोर्ट

मुख्यमंत्र्याकडे बहुमत आहे का? सुप्रीम कोर्टाचा सवाल

आता एक पवार आमच्यासोबत आहेत, दुसरे पवार दुसऱ्या बाजूला आहेत. त्यांच्या कौटुंबिक भांडणाशी आमचं काय संबंध? अॅड. मुकूल रोहातगी

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १७० आमदारांचे समर्थन, भाजपचे १०५ राष्ट्रवादीचे ५४ त्यामुळे आमदार फोडाफोडीचा प्रश्नच नाही: अॅड तुषार मेहता

मी अजित पवार राष्ट्रवादीचा गटनेता आहे, मला सगळ्या आमदारांचं समर्थन आहे…अजित पवारांच्या पत्रातील मजकूर

सर्व पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी नकार दिल्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली: अॅड. तुषार मेहता

राज्यपालांनी वेळ दिल्यावर वाट पाहिली: अॅड. तुषार मेहता

राज्यपालांनी प्रत्येकाला योग्य वेळ दिला: अॅड. तुषार मेहता

अजित पवार यांनी २२ नोव्हेंबर रोजी राज्यपालांना दिलेल्या पत्राची प्रतही तुषार मेहता यांनी सादर केली

देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित करणारे राज्यपालांचे पत्र तुषार मेहता यांनी खंडपीठाकडे सोपवलं

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments