Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeविदर्भनागपूरगुन्ह्यांची लपवाछपवी : देवेंद्र फडणवीस स्वत: हजर झाले कोर्टात; जामीन मंजूर

गुन्ह्यांची लपवाछपवी : देवेंद्र फडणवीस स्वत: हजर झाले कोर्टात; जामीन मंजूर

Will BJP's 15 MLAs leave BJP?

नागपूर : निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिका प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आज गुरुवारी नागपूर कोर्टात दिलासा मिळाला आहे. फडणवीस आज न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर त्यांचा जामीन मंजुर झाला.

देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखल दोन गुन्हेगारी खटले लपवल्याचा आरोप फडणवीस यांच्यावर आहे. याआधी नागपूर कोर्टाने समन्स बजावून देवेंद्र फडणवीस यांना हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु त्यावेळी त्यांचे वकील कोर्टात हजर होते. परंतु आज गुरुवारच्या सुनावणीला स्वत: फडणवीस उपस्थित झाले होते. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात १९९६ आणि १९९८ मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागपत्रांसर्भात गुन्हा दाखल केला होता. परंतु दोन्ही प्रकरणात आरोपांची निश्चिती झाली नव्हती. अॅड. सतीश उके यांच्या आरोपांनुसार, फडणवीसांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात या गुन्ह्यांची माहिती लपवली होती. अॅड. सतीश उके २०१४ पासूनच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई लढवत आहेत.

हे आहे प्रकरण?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना, प्रतिज्ञापत्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधातील दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत अॅड सतीश उके यांनी तक्रार दाखल केली होती. नंतर त्यांनी जेएमएफसी न्यायालयात याचिका ही दाखल केली होती. विशेष म्हणजे अॅड. सतीश उके यांनी दाखल केलेली ती याचिका तत्कालीन जेएमएफसी न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली होती. त्यानंतर अॅड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१९ मध्ये या प्रकरणावर प्राथमिक (कनिष्ठ) न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिल्यानंतर नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या समक्ष १ नोव्हेंबरपासून पुन्हा सुनावणीस सुरुवात झाली होती. सुनावणी दरम्यान न्यायालयाने नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस जारी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments