Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईइक्बाल मिर्ची प्रकरणात डीएचएफएलच्या वाधवानला अटक

इक्बाल मिर्ची प्रकरणात डीएचएफएलच्या वाधवानला अटक

Kapil Wadhawan Iqbal Mirchi,Kapil Wadhawan, Iqbal Mirchi,Kapil, Wadhawan, Iqbal, Mirchiमुंबई : इक्बाल मिर्ची मनी लाँड्रिंग प्रकरणात दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या (डीएचएफएल) व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना ईडीने अटक केली आहे. वाधवान यांना पीएमएलए कायद्यातंर्गत अटक करण्यात आली आली आहे.

दाऊदचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्या मालमत्तेबाबत ईडीने चौकशी सुरू केली असून मिर्चीने त्याचा गुन्हेगारीतला पैसा या मालमत्तेत गुंतवला असल्याचा ईडीचा दावा आहे. वाधवानच्या डीएचएफएल कंपनीने सनब्लिंक रिअल इस्टेट प्रा. लिमिटेड कंपनीला २१८६ कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे समोर आले आहे. ही कंपनी इक्बाल मिर्चीशी संबंधित असल्याची चर्चा आहे.

वाधवान याला अटक करण्यात आली असून अधिक चौकशीसाठी विशेष कोर्टाने वाधवानला २९ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे. देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्याविरोधात याआधीच लूक आउट नोटीस जारी करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments