Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईवजनदार मंत्रिमंडळाला नाराजांचे विघ्न!

वजनदार मंत्रिमंडळाला नाराजांचे विघ्न!

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला. काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमधील अनुभवी नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आता ४३ मंत्र्यांचा जॅम्बो मंत्रिमंडळ तयार झाले आहेत. मात्र, या मंत्रिमंडळाला नाराजांचे विघ्न लागले असून तिन्ही पक्षांमधून नाराजांचा सूर निघत आहे.

उध्दव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे विस्तार सोमवारी मोठ्या थाटात झाले. या मंत्रिमंडळ सोहळ्यात नाराज आमदारांना दांडी मारली. आता नाराज आमदारांमधून आणि त्यांच्या समर्थकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे नाराजांची मनधरणी कशी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने १५ आमदार निवडून आलेल्या विदर्भाला चार कॅबिनेट मंत्री दिले आहेत. राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्राला, तर शिवसेनेने मुंबई व कोकणाला झुकते माप दिले आहे. विदर्भाला सात कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्राला सात आणि उत्तर महाराष्ट्राला सात मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र, १२ जिल्ह्यांना प्रतिनिधी मिळाले नाही.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे १६ मंत्री आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे १६ तर काँग्रेसचे १३ मंत्री आहेत. तसेच विधानसभा अध्यक्षही काँग्रेसकडेच आहेत.

तिन्ही पक्षांमध्ये नाराजांचे मनवळविण्याचे प्रयत्न….

तिन्ही पक्षांमध्ये नाराज आमदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे मन वळविण्यासाठी तिन्ही पक्षाचे राज्याचे प्रमुख कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके, शिवसेनेचे प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल तर काँग्रेसचे अमिन पटेल हे सुध्दा नाराज आहेत.

हे आहेत वजनदार मंत्रीमंडळ…

महाराष्ट्र विकास आघाडीचे मंत्रीमंडळ वजनदार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते व कायद्याचा बारीक अभ्यास असणारे नवाब मलिक, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सोबत काम करणारे त्यांचे पुत्र अमित देशमुख त्याशिवाय मंत्रीमंडळाचा अनूभव असणारे राजेश टोपे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड असे अनेक नेते या मंत्रीमंडळात आहे तर पहिल्याच वेळी मंत्री झालेल्या १९ जणांची टीमही यात आहे. परंतु मात्र, नाराजांमुळे याची जास्त चर्चा सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments