Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याएक डिसेंबर आधी 'हे' करा, नाहीतर भरा दुप्पट टोल

एक डिसेंबर आधी ‘हे’ करा, नाहीतर भरा दुप्पट टोल

Do this before one December, otherwise pay double  toll
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 14 ऑक्टोबर रोजी ‘वन नेशन वन फास्टॅग’ (One Nation, One Fastag) योजनेची घोषणा केली होती. 1 डिसेंबर 2019 पासून ही योजना देशभरात राबविली जाणार आहे. 1 डिसेंबर पासून टोल नाक्यांवर सर्व गाडयांना आता फास्टटॅगच्या आधारे टोल भरावा लागणार आहे. ज्या वाहनाला फास्टटॅग नसेल, त्यांच्या कडून दुप्पट टोल वसूल केला जाईल.

‘एक देश एक फास्टॅग’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, सध्या राष्ट्रीय महामार्गावर एकूण 527 टोल प्लाझा आहेत, त्यापैकी 380 टोल प्लाझाच्या सर्व लेन फास्टॅगसह सुसज्ज आहेत. उर्वरित लेन लवकरच देखील फास्टॅगसह सुसज्ज होतील. 1 डिसेंबरपासून देशातील सर्व टोल प्लाझावर अशी व्यवस्था केली जाईल. फास्टॅगची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले की, फास्टॅग यंत्रणा लागू झाल्यानंतर टोल प्लाझावर गर्दी होणार नाही, यामुळे लोकांचा वेळ वाचणार आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणाला पत्र लिहून यासंबंधीचे आदेश पाळण्याच्या सूचना केल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून नवीन वाहनांना फास्टटॅग लावणे अनिवार्य आहे. त्यामुळे कंपन्या पहिल्यापासूनच वाहनांना फास्टटॅग लावून देत आहेत. जर तुमच्याकडे दोन वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे तर तुम्हाला गाडीवर फास्टटॅग लावून घेण्याची गरज आहे.

येथून घेऊ शकता गाडीवरील ‘फास्टटॅग’

१) भारतीय राष्ट्रीय राज्यमहामार्ग प्राधिकरणाचा टोलनाका
२) एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय समवेत अनेक बँक
३) ऑनलाइन प्लेटफॉर्म – पेटीएम, अमेझॉन डॉट कॉम
४) इंडियन ऑईल कॉरपोरेशन, भारत पेट्रोलियम, हिन्दुस्तान पेट्रोलियमचे पेट्रोल पंप
५) नॅशनल हायवे अथॉरिटीचे ‘माय फास्ट ऐप’

फास्टटॅग मिळवण्यासाठी या कागदपत्रांची आहे गरज

१) पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
२) पासपोर्ट साइज फोटो
३) केवाईसी डॉक्यूमेंट, आयडी प्रूफ, अड्रेस प्रूफ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments