Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं

कोरोनामुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा, न्यूज पेपरनं रिकामी सोडली पानं

Coronavirus Toiletpaper,Coronavirus, Toiletpaperमुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यांचा परिणाम वस्तू, सेवा आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या कोरोनामुळे चक्क टॉयलेट पेपरची कमतरता मोठ्य़ा प्रमाणात जाणवायला लागली आहे. या टॉयलेट पेपरच्या जागी लोक वृत्तपत्रांचा वापर करत आहेत. ट्विटरवर #ToiletPaperEmergency आणि #ToiletPaperApocalypse असे दोन हॅशटॅग ट्रेन्ड होत आहेत. लोकांची समस्या लक्षात घेऊन तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांनी वृत्तपत्रातील काही पानं कोरी सोडली आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओला २ हजारहून अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे. तर ६ हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. युझर्सनी या व्हिडीओवर तुफान कमेंट्स केल्या आहेत. ‘आम्ही वाचकांच्या समस्या समजून त्या वेळोवेळी आपल्या वृत्तपत्रात मांडत असतो. यावेळी नागरिकांची टॉयलेट पेपरची समस्याही आम्ही समजून घेतली आणि ती पूर्ण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे.’ असं या वृत्तपत्राच्या संपादकीय लेखात उल्लेख करण्यात आला आहे. नॉर्थ ऑस्ट्रेलियामध्ये गुरुवारी वृत्तपत्रात ८ ज्यादा पानांचा समावेश कऱण्यात आला होता. ही पानं कोरी सोडण्यात आली त्यावर केवळ वृत्तपत्राचा वॉटरमार्क छापण्यात आला होता. नागरिकांनी या पानांचा टॉयलेट पेपर म्हणून वापर करावा असं आवाहनही करण्यात आलं होतं.

८० देशांमध्ये कोरोना व्हायरस घुसला…

आतापर्यंत ८० देशांमध्ये कोरोना व्हायरस घुसला असून हजारो लोकांना लागण झाली आहे. याचा परिणाम वस्तू आणि सेवांवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं पाहायला मिळत आहे. कुठे सॅनिटायझर तर कुठे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू तर कुठे औषधांचा साधा आणि पुरवठ्यातली तूट पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments