Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून प्रचारासाठी तोफा धडाडणार; सभांना लागला मुहूर्त

आजपासून प्रचारासाठी तोफा धडाडणार; सभांना लागला मुहूर्त

Maharashtra BJP Congress MNS NCP ShivSena
विधानसभा निवडणुकीसाठी आज पासून सभांचा धडाका सुरु झाला आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या महाराष्ट्रातील चार मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. हे चार नेते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

येत्या २१ ऑक्टोबरला राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. आता हेच पक्ष आजपासून रस्त्यावर उतरुन निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या महाराष्ट्रातील चार मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत. मुख्यमंत्री आज धुळे दौऱ्यावर आहेत, उद्धव ठाकरे संगमनेर, राज ठाकरे पुणे तर शरद पवार अकोला आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असणार आहेत.

शरद पवार यांचा आज अकोला आणि वाशिम दौरा

शरद पवार आज सकाळी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अकोल्यातील बाळापूर येते सकाळी साडे अकरा वाजता त्यांची सभा होईल. त्यानंतर ते वाशिमच्या दिशेला मार्गस्थ होणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा येथे दुपारी ४ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा आज धुळे दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर आहेत. धुळे ग्रामीण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानज्योत भदाणे यांच्या प्रचारासाठी शिरपूर येथे दुपारी बारा वाजता त्यांची सभा होईल. त्यानंतर साक्री येथे महायुतीचे उमेदवार मोहन सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी दुपारी एक वाजता सभा होईल.

राज ठाकरे पुण्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा आज पुण्यात होणार आहे. ही सभा आज संध्याकाळी सहा वाजता पुण्याच्या सरस्वती मंदिर मैदानात होणार आहे.

उद्धव ठाकरे संगमनेर दौऱ्यावर

उद्धव ठाकरे आज संगमनेर दौऱ्यावर आहेत. संगमनेरव येथील जाणता राजा मैदान येथे त्यांची दुपारी बारा वाजता त्यांची सभा होईल. दुपारी दोन वाजता श्रीरामपूर येथे त्यांची सभा होईल. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता पारनेर तर अहमदनगर येथे दुपारी सहा वाजता असा एकूण चार सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments