Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईअंधेरी रेल्वेस्थानकावर सरकता जिना उलट्या दिशेने येतो तेव्हा

अंधेरी रेल्वेस्थानकावर सरकता जिना उलट्या दिशेने येतो तेव्हा

Andheri Railway Escalator,Andheri Railway, Escalator,Andheri, Railway, Railway Escalatorमुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावर प्रवासी रेल्वेतून उतरतात. उतरल्यानंतर प्रवासी दुस-या फ्लॅटफार्मवर जाण्याच्या घाई घडबडीत असतात. बाहेर पडण्यासाठी सरकता जिना (एस्कलेटर) चा वापर करतात. अचानक उलटा जाऊ लागल्याने एकच गोंधळ  उडतो. प्रवासी एकमेकांवर आदळून दोघं जण किरकोळ जखमी होतात. ही घटना अंधेरी रेल्वे स्थानकावर घडली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

मुंबईतील पश्चिम रेल्वेवर असलेल्या अंधेरी स्थानकावर कायम प्रवाशांची गर्दी असते. त्यातच प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर दादरकडील दिशेला असलेला सरकता जिना अचानक उलटा फिरु लागला. सरकता जिना वर जाण्याऐवजी खालच्या दिशेने जाऊ लागल्याने प्रवासी एकमेकांवर आपटले. त्यापैकी दोघेजण किरकोळ जखमी झाले. हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना सोमवारी (१७ फेब्रुवारी) संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी घडली. हा प्रकार स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा प्रकार आज बुधवारी समोर आला.

सरकत्या जिन्याचा प्रवास उलट दिशेने सुरु असतानाच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत जिना थांबवण्यासाठी असलेले आपत्कालीन बटण दाबले. परिणामी जिना त्वरीत थांबला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments