Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसत्तापालट झालं तरी सुध्दा ‘हे’ माजी मंत्री बंगले सोडेना!

सत्तापालट झालं तरी सुध्दा ‘हे’ माजी मंत्री बंगले सोडेना!

Sudhir Mungantiwar, Jaydutt Kshirsagar,Sudhir Mungantiwar Jaydutt Kshirsagar,Sudhir, Mungantiwar, Jaydutt, Kshirsagarमुंबई : महाराष्ट्रात सत्तापालट झालं तरी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमधील ९ मंत्र्यांनी बंगले सोडले नव्हते. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं त्या मंत्र्यांना बंगले सोडण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. नोटीस पाठवण्यात आलेल्या नऊ पैकी सात मंत्र्यांनी बंगले सोडले आहेत. माजी मंत्री मुनगंटीवार आणि जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी अद्याप बंगले सोडलेले नाहीत.

नोटीसा पाठवण्यात आलेल्या मंत्र्यांपैकी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारसह जयदत्त क्षीरसागर, यांनी अद्यापही बंगले सोडलेले नाहीत. रामदास कदम, सुभाष देशमुख, दीपक केसरकर, अर्जुन खोतकर आणि नुकतेच पक्षात दाखल झालेले क्षीरसागर अशा या शिवसेनेच्या पाच माजी मंत्र्यांचा समावेश आहे. याचबरोबर मदन येरावर, अविनाश महातेकर, सुरेश खाडे यांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगले खाली करण्याची नोटीस पाठवली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटीसा पाठवलेल्या मंत्र्यांमध्ये भाजपाबरोबरच शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश आहे. यामध्ये रामदास कदम, सुभाष देशमुख, दीपक केसरकर, अर्जुन खोतकर आणि नुकतेच पक्षात दाखल झालेले क्षीरसागर अशा या शिवसेनेच्या पाच माजी मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच मदन येरावर, अविनाश महातेकर, सुरेश खाडे यांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगले खाली करण्याची नोटीस पाठवली आहे. 

या माजी मंत्र्यांना नोटीसा…

अविनाश महातेकर

सुरेश खाडे

मदन येरावर

सुधीर मुनगंटीवार (बंगला सोडलेला नाही)

या माजी मंत्र्यांना नोटीसा…

दीपक केसरकर

रामदास कदम

अर्जुन खोतकर

सुभाष देशमुख

जयदत्त क्षीरसागर (बंगला सोडलेला नाही)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments