Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईहेरगिरी : फडणवीस सरकारने ‘या’ नेत्यांचे केले फोन टॅप!

हेरगिरी : फडणवीस सरकारने ‘या’ नेत्यांचे केले फोन टॅप!

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅपींग करण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारवर महाआघाडीच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या फोन टॅपींग करण्यात आले आहे.

तुमचे फोन टॅप होत आहेत, अशी माहिती एका भाजपाच्याच मंत्र्यानं दिली असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात काही जणांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. या चर्चांदरम्यानच संजय राऊत यांनी ट्विटरवरून हा दावा केला आहे.

“तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. जर माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही. ऐका माझं बोलणं,” अशा आशयाचं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारनं यापूर्वी झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केला होता. या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं दिलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments