Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’

आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर ‘फास्टॅग’

Representational Image

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर आज १५ डिसेंबर रविवारपासून फास्टॅग योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे टोलनाक्यांतून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व झटपट होईल. फास्टॅग नसेली वाहने फास्टॅगच्या मार्गिकेतून गेल्यास वाहन चालकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे.

टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल त्यानंतर, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. याआधी १ डिसेंबरला योजना लागू केली जाणार होती.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहन चालकांना मोठय़ा रांगांना सामोरे जावे लागते. सध्या टोलनाक्यांवर एका मार्गिकेतून जाताना फास्टॅगची योजना, तर उर्वरित मार्गिकेतून जाताना रोख रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहन चालकांचा गर्दीच्या वेळेतील प्रवास अत्यंत धीमा होत होता. हे टाळण्यासाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांवर तर उर्वरित एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा अंमलात आणली जाणार होती. मात्र १५ डिसेंबरपासून अंमलात येणाऱ्या योजनेत आता टोलनाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच फास्टॅग असेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

फास्टॅग नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच काम करणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन टॅग घ्यावे लागेल व नोंदणी करावी लागणार आहे.

येथे फास्टॅगची उपलब्ध आहे…

वाहन चालकांना फास्टॅग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माय फास्टॅग अ‍ॅपवर उपलब्ध आहे. तर आयएचएमसीएल डॉट कॉम बेवसाईटवरही फास्टॅग मिळेल. याशिवाय भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कॉपरेरेशनच्या पेट्रोल पंपावरही टॅग मिळणार आहे. २२ बँकांच्या शाखांमध्येही याची सुविधा असेल. यात एसबीआय, आयसीआसीआय, अ‍ॅक्सिस बँकाच्या शाखांचा समावेश आहे.

पेटीएम, अ‍ॅमेझानसारख्या ऑनलाइन पोर्टलवरही फास्टॅग मिळणार आहे. वाहनावर फास्टॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यांवर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनावरील टॅग वाचेल व टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातील. पैसे खात्यातूच जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याची माहिती मिळेल.

फास्टॅग मिळवण्यासाठी हे करा…

फास्टॅग मिळवण्यासाठी कार मालकाचे केवायसी कागदपत्र, ओळखपत्र, वास्तव्याचा पुरावा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र व मालकाचा फोटो हवा

डेबिट-क्रेडीट कार्ड, आरटीजीसी, चेकद्वारे टॅग ऑनलाइन रिचार्ज करण्याची सुविधा
टोल नाक्यावरून जाताना वाहन चालकांना वाहनाचा वेग कमी ठेवावा लागेल.

एक लाख रुपयांपर्यंत फास्टॅग रिचार्ज करता येणार असून बचत खात्याला लिंक करता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments