Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसंतापजनक : जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार

संतापजनक : जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलीवर अत्याचार

सोलापूर : सोलापुरात पंधरा दिवसांपूर्वी एका दलित अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली होती. ही घटना ताजी असताना सोलापुरात बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. पित्यानंच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुरडीच्या आईनंच पोलिसांत याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहेत.

जन्मदात्या पित्यानंच आपल्या पोटच्या मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची घटना सोलापुरातून समोर आली आहे. आपल्या पतीनंच मुलीवर लैगिक अत्याचार केल्याची तक्रार चिमुरडीच्या आईनं पोलिसांत दाखल केली आहे. तसंच गेल्या दोन वर्षांपासून आपला पती मुलीवर अत्याचार करत असल्याचंही तिच्या आईचं म्हणणं आहे. दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी रात्री घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत आपल्या पतीनं मुलीला उठवून तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पित्यानं मुलीवर दोन वर्षे अत्याचार केल्याचाही आरोप

संबंधित प्रसंग कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत पित्यानं मुलीवर दोन वर्षे अत्याचार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या पित्याला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments