Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
HomeदेशCAA ला पाठिंबा देणा-या संघाच्या उलेमा परिषदेत ‘दे दणादण’!

CAA ला पाठिंबा देणा-या संघाच्या उलेमा परिषदेत ‘दे दणादण’!

Ulema Conference fight,Ulema Conference, fight,Ulema,COnferenceनवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) समर्थनासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने दिल्लीत राष्ट्रीय उलेमा परिषदेत बोलावली होती. यावेळी मुस्लिमांच्या दोन गटांमध्ये वाद चिघळला. CAA – NRC विरोधात घोषणाबाजी देण्यात आली. यामुळे संघाची उलेमा परिषदे झालीच नाही. विशेष म्हणजे हा प्रकार संघाचे नेते इंद्रेश कुमार यांच्या समोर हा प्रकार घडला.

देशभरात CAA आणि NRC ला विरोध होत आहेत. जवळपास ५० पेक्षा जास्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र या कायद्याला समर्थन देण्यासाठी संघाने उलेमा परिषद बोलावली होती. काही प्रमुख मुस्लिम नेतेही या परिषदेसाठी आले होते. दरम्यान, परिषद सुरू असतानाच अचानक काही उपस्थितांनी CAA आणि NRC विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांनी निषेधाचे फलकही झळकावले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय मुस्लिम मंचाने या परिषदेचे आयोजन केले होते. सीएए व एनआरसी कायद्यांच्या समर्थनासाठी ही परिषद होती. या कायद्यांबाबत मुस्लिम समाजात जो गैरसमज पसरला आहे तो दूर करण्यासाठी ही परिषद असल्याचा दावा आरएसएसकडून करण्यात आला.

सीएए विरोधात घोषणा देणाऱ्यांना बाहेर हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असता जोरदार राडा झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. वाढता तणाव लक्षात घेऊन पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिषदेत घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments