Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या अंधेरीत रोल्टा कंपनीत पाच तासापासून अग्नितांडव

मुंबईच्या अंधेरीत रोल्टा कंपनीत पाच तासापासून अग्नितांडव

थर्मल इमॅजीन कॅमेरॅच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न

Andheri Rolta Company Fire,Andheri Fire, Rolta Company Fire,Rolta Fire,Andheri, Rolta ,Company, Fire,Andheri Rolta ,Andheri Company Fire,Andheri Companyमुंबई : अंधेरी पूर्वमधील सिप्झ एमआयडीमधील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला गुरुवारी भीषण आग लागली. ही आग पाच तासापासून विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. १९ गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत. सकाळी दहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

थर्मल इमॅजीन कॅमेरॅच्या मदतीने आग नेमकी कुठे लागलीय याचा शोध घेऊन ती विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाच तास उलटले तरी सुध्दा ही आग नियंत्रणात आली नाही. सध्या ही आग आणखीनच भडकत चालली आहे. सकाळी दहा वाजता शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या अग्निशमन दलाच्या १९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र आग अद्यापही आटोक्यात आली नाही.

ही इमारत संपूर्ण काचेची इमारत असल्याने यामध्ये हवा खेळती राहत नसल्याने प्रचंड धूर आणि आगीचे लोळ उठत असल्याने आग विझवण्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, या इमारतीची वीज बंद करण्यात आली आहे. सुदैवानं या इमारतीत कोणताही कर्मचारी अडकलेला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. किती लोक इमारतीत अडकले याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र आजूबाजुच्या इमारतीमधील लोकांना धुरामुळे त्रास सुरु झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments