अक्षय कुमारचा जेएमयूच्या आंदोलकांना आधी पाठिंबा, नंतर….

- Advertisement -

मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात ईशान्य भारतात सुरु असलेले हिंसक आंदोलन आता देशाची राजकीय राजधानी दिल्लीतही पोहोचले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील (जेएमयू) च्या विद्यार्थ्यांचं ट्वीट लाईक केल्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर अक्षयने आपल्याकडून अनवधानाने हा प्रकार घडल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या ट्वीटवरील ‘लाईक’बाबत मी सांगू इच्छितो, ते चुकून झालं. मी ट्विटर फीडमध्ये स्क्रोलिंग करत होतो आणि ते (लाईक बटण) चुकून प्रेस झालं असावं. पण जेव्हा मला हे समजलं, तेव्हा मी लगेच ‘अनलाईक’ केलं. कारण मी अशा कोणत्याही प्रकारच्या कृत्याचं समर्थन करत नाही.’ असं स्पष्टीकरण अक्षयकुमारने ट्विटरवरुन दिलं आहे.

- Advertisement -

‘जामिया मिलिया इस्लामिया’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या विरोधात केलेलं ट्वीट अक्षय कुमारने लाईक केल्याचं पाहून त्याचे चाहत्यांना प्रश्न पडला होता. विशेष म्हणजे अक्षय या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन का केलं , असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता अक्षयच्या स्पष्टीकरणामुळे या शंका दूर झाल्या आहेत. परंतु सोशल मीडियावर अक्षय बद्दल टिकेची झोड उडवली जात आहे.

- Advertisement -