Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

anil goteमुंबई : भाजपने आमदार अनिल गोटे यांचा तिकीट कापल्यामुळे ते भाजपावर नाराज होते. अखेर अनिल गोटे आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे. हेच औचित्य साधत अनिल गोटे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईत दुपारी १२.३० वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. धुळ्याचे भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी एप्रिल महिन्यात पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता.

धुळे महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांच्या समर्थकांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यामुळे ते भाजपवर नाराज होते. नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. त्याचवेळी ते भाजपा सोडतील, असे बोलले जात होते. अखेर त्यांनी एप्रिलमध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता. अनिल गोटे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा तर आमदारकीचा राजीनामा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवला होता.

भाजपातर्फे धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्यावेळी विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात आमदार अनिल गोटे यांना भाषण करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. यावेळी अनिल गोटे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ केला होता. अनिल गोटे यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती. हा वाद चांगलाच वाढला आणि खुर्च्यांची फेकाफेक झाली. या गोंधळामुळे गोटे यांना न बोलताच मेळाव्यातून बाहेर पडावे लागले होते.

भाजपतर्फे विजय संकल्प कार्यकर्ता मेळाव्यातील प्रसंगानंतर अनिल गोटे यांनी धुळ्याच्या महापौरपदावर दावा ठोकला होता. त्यांचे उमेदवारही दिले होते. परंतु त्यांना यश मिळाले नव्हते. विधानसभा निवडणुकीतही अनिल गोटे यांनी त्यांच्या संघटनेतर्फे महाआघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढली होती. परंतु त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments