Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडामाजी क्रिकेटपटूची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, चित्रपटात झळकणार!

माजी क्रिकेटपटूची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, चित्रपटात झळकणार!

Friendship Harbhajan Singh,Friendship, Harbhajan Singh,Harbhajan, Singhमुंबई : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे खेळाचा मैदान गाजवणारा हा माजी क्रिकेटपटू सिनेमाच्या दुनियेत जादू चालवणार का याकडे त्याच्या चाहत्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

 

‘फ्रेंडशीप’ नावाचा त्याचा सिनेमा येतोय. यात हरभजन चक्क अभिनय करणार आहे. विशेष म्हणजे तो या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहे. पहिल्यांदाच एखादा क्रिकेटपटू सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी भज्जीच्या या रोलची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.

हरभजन सिंहचा हा पदार्पणाचा सिनेमा कसा असेल, याबाबत त्याच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असणार आहे. दरम्यान निर्मात्यांनी या सिनेमाचा फर्स्ट लुक ट्विटरवर पोस्ट केला आहे. यासोबत लिहिलंय, ‘भारतीय सिनेमात पहिल्यांदाच क्रिकेटपटू हरभजन सिंह अपकमिंग फिल्म ‘फ्रेंडशीप’ मध्ये लीड रोल करणार आहे.’ या सिनेमाच्या पोस्टरमध्ये कोणाचा चेहरा तर दिसत नाहीए, पण हातात बेडी असलेले दोन हात दिसत आहेत. शिवाय एक क्रिकेटचं रिकामं मैदानही दिसत आहे.

हरभजन सिंहने देखील या सिनेमाचं पोस्टर आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक जेपीआर आणि शाम सूर्या आहेत. जेपीआर आणि स्टालिन यांनी सिनेमाची निर्मितीही केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments