Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादेत भाजपला खिंडार, माजी आमदार- उपमहापौरांनी बांधले शिवबंधन!

औरंगाबादेत भाजपला खिंडार, माजी आमदार- उपमहापौरांनी बांधले शिवबंधन!

Kishanchand Tanwani Thackeray,Kishanchand, Tanwani, Thackeray,Kishanchand Tanwaniमुंबई : औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी शहर, जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार किशनचंद तनवाणींसह, माजी उपमहापौर गजानन बारवाल यांनी आज (बुधवार) शिवसेनेत घरवापसी केली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून घेतले.

पक्षप्रवेश सोहळा मातोश्री निवासस्थानी पार पडला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई,  शिवसेना आमदार संजय शिरसाट, विधान परिषदचे सदस्य अंबादास दानवे यांची उपस्थिती होती. भाजपचे काही नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. एप्रिलमध्ये औरंगाबाद महानगर पालिका निवडणुका होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकरुन निवडणूक लढणार आहेत, त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray Kishanchand Tanwani,Uddhav Thackeray, Kishanchand Tanwani,Uddhav, Thackeray, Kishanchand, Tanwani

किशनचंद तनवाणी मुळचे शिवसैनिक असून त्यांनी शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला होता. २०१४ मध्ये भाजपकडून मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. तनवाणींकडे भाजपचे शहराध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र २०१९ मध्ये शिवसेना भाजप युती झाल्यानंतर औरंगाबाद मध्य मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे तनवाणी यांना पक्षश्रेष्ठींनी माघार घ्यायला भाग पाडले होते. तेव्हापासून तनवाणी नाराज होते. नाराजीमुळे ते भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे.

किशनचंद तनवाणी हे शिवसेनेत असतांना महापौरपद, शिवसेना शहर प्रमुख, विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांना कामाचा अनुभव आहे. पक्षसंघटनेचे चांगले अनुभव कार्यकर्त्यांची मोठी फळी ही त्यांची जमेची बाजू आहे. तसेच दांडगा जनसंपर्क असल्यामुळे शिवसेनेला पुन्हा सत्ता टिकवण्यासाठी चांगलाच फायदा होणार आहे. तनवाणींच्या प्रवेशामुळे शिवसैनिकांध्ये उत्साह संचारला आहे. लवकरच शिवसेनेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये भाजपच्या काही नगरसेवकांचा प्रवेशसोहळा संपन्न होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments