Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेसोबत सरकार बनवणं म्हणजे काँग्रेसला गाडण्यासारखं : संजय निरूपम

शिवसेनेसोबत सरकार बनवणं म्हणजे काँग्रेसला गाडण्यासारखं : संजय निरूपम

Forming a government with the Shiv Sena is like burying the Congress Sanjay Nirupam
मुंबई : राज्यात शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याला विरोध दर्शवला असून इशारा दिला आहे. शिवसेनेसोबत सरकार बनवणं म्हणजे काँग्रेस पक्षाला गाडण्यासारखं आहे. असं निरुपम यांनी टि्वटरव्दारे म्हटलं आहे.

शिवसेनेसोबत लवकरच सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान काँग्रेस नेते निरुपम यांनी पुन्हा एकदा शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याला विरोध दर्शवला असून इशारा दिला आहे. निरूपम वारंवार शिवसेनेसोबतच्या घरोब्यावरून काँग्रेसवर शरसंधानसाधत आहेत. काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. आजही दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरु आहे.


निरुपम यांनी उत्तरप्रदेशचं उदाहरण दिलं आहे. काही वर्षापुर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेशात बसपासोबत आघाडी करत चूक केली होती. तेव्हा काँग्रेसला असा फटका बसला होता, ती आजपर्यंत उठू शकलेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा ते तीच चूक करत आहेत. शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होणं म्हणजे काँग्रेसला जमिनीत गाडण्यासारखं आहे. निरुपम यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्षांनी दबावात येता कामा नये असं मत व्यक्त केलं आहे. निरूपम काँग्रेसपासून लांब जात असल्याचे सध्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments