Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईफ्री काश्मीर : काश्मीरला ‘या’ निर्बंधातून मुक्त करावे : संजय राऊत

फ्री काश्मीर : काश्मीरला ‘या’ निर्बंधातून मुक्त करावे : संजय राऊत

shivsena sanjay raut troll bjp on twitterमुंबई : दिल्लीतील जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान एका आंदोलक तरुणीने ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर झळकवल्याने भाजपने राजकारण सुरु केले आहे. त्याला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिल आहे.

‘फ्री काश्मीर’ फलकाबाबत प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांचा संदर्भ देत या पोस्टरचा वेगळा अर्थ काढू नये, असे राऊत यांनी सांगितले. काश्मीरमध्ये केंद्राकडून अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. तेथील इंटरनेट, मोबाइल सेवा तसेच अन्य विविध सेवा बंद आहेत. या निर्बंधांतून काश्मीरला मुक्त करावे, अशी भावना हे पोस्टर झळकवण्यामागे होती, असे या बातम्यांतून स्पष्ट झाले आहे, असे राऊत यांनी नमूद केले. त्याचवेळी काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याची भाषा कुणी करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले.

जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्यावर राऊत यांनी पुन्हा एकदा तीव्र प्रतिक्रिया दिली. रात्रीच्या अंधारात चेहरे झाकून चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर हल्ले करत असतात, असे राऊत म्हणाले. गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलकांवर कोणत्याही प्रकारे पोलिसी बळाचा वापर करण्यात आलेला नसून आंदोलनाची केवळ जागा बदलण्याचे सोपस्कार पोलिसांनी पार पाडलेत, असे राऊत यांनी पुढे नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments