Thursday, March 28, 2024
Homeदेशरेल्वे स्थानकांवरील ‘मोफत वायफाय’ सेवा बंद होणार

रेल्वे स्थानकांवरील ‘मोफत वायफाय’ सेवा बंद होणार

नवी दिल्ली : मोबाइल कंपन्या स्वस्त दरात इंटरनेट डेटा देत आहेत. त्यामुळे आम्हाला रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्याची गरज राहिलेली नाही, असं गुगलने म्हटले आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत वाय फाय सेवा बंद होणार आहे.

देशातली ४०० रेल्वेस्थानकांवर  मोफत वायफाय सेवा मिळत होती. परंतु ती सेवा कधी बंद होणार याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. गुगलने पाच वर्षापूर्वी रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरु केली होती. २०२० पर्यंत देशातील ४०० रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याच्या दोन दोन वर्ष आधी २०१८ मध्ये सर्व ४०० स्थानकांवर मोफत सेवा  सुरु झाली होती.

रेलटेलची सेवा सुरुच राहणार…

भारतातील ५५०० पेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर रेलटेलची मोफत वायफाय सेवा उपलब्ध आहे.  त्यामुळे गुगलने आपली मोफत सेवा बंद केल्याचा परिणाम होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments