संतापजनक: पोलिसांनी मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले

- Advertisement -
girls-forced-to-strip-in-front-of-police-and-unknown-men
girls-forced-to-strip-in-front-of-police-and-unknown-men

जळगाव: शासकीय आशादीप महिला वसतिगृह येथे संतापजनक प्रकार घडला. काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले. ज्या मुलींनी विरोध केला त्यांना या धक्कादायक कृतीसाठी भाग पाडण्यात आले. सामाजिक संघटनांनी या घटनेला वाचा फोडली. जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणात तक्रार झाली. घटनेचा व्हिडीओ सादर झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी चौकशी करण्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले.

महिला व बालकल्याण विभाग यांच्यावतीने गणेश कॉलनी येथील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी येत होत्या. जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोझ पिंजारी, फरिद खान, मंगला सोनावणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृहाला भेट दिली. महिला आणि मुलींशी चर्चा केली. यावेळी १ मार्च रोजी घडलेली घटना उघड झाली.

शासकीय आशादीप महिला वसतिगृह येथे १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले. ज्या मुलींनी विरोध केला त्यांना या धक्कादायक कृतीसाठी भाग पाडण्यात आले. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पोलीस चौकशीचे निमित्त करुन निवडक पोलीस आणि बाहेरील पुरुषांना वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. यानंतर धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणात तक्रार करणाऱ्या करणारी मुली आणि महिलांवर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण जननायक फाउंडेशनच्या सदस्यांसमोर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना जास्त दमदाटी करणे शक्य झाले नाही. अखेर निवडक मुली आणि महिलांच्या धाडसामुळे गैरप्रकाराला वाचा फुटली.

- Advertisement -

याआधी जानेवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यातील चिखलदार तालुक्यातील सेमाडोहमध्ये जय महाकाली मुलींच्या वसतिगृहात बेकायदा दारू निर्मिती सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांना अटक केली. पोलिसांनी मुलींच्या वसतिगृहातील दारू कारखान्यातून मोठा मुद्देमाल जप्त केला. यात दारू निर्मितीचा कच्चा माल, यंत्रणा, दारू भरण्यासाठी हजारो रिकाम्या बाटल्या या साहित्याचा समावेश होता. हा मुद्दा विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. मुलींच्या वसतिगृहातील दारूच्या कारखान्यावरुन फडणवीस यांनी राज्य सरकारला कायदा-सुव्यवस्थाप्रश्नी जाब विचारला. या घटनेला २४ तास होण्याआधीच जळगाव जिल्ह्यातील शासकीय आशादीप महिला वसतिगृह येथे संतापजनक प्रकार घडल्याचे उघड झाले. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक झालेली नाही अथवा ताब्यात घेतलेले नाही.

 

- Advertisement -