Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशऑक्सफर्ड डिक्शनरीकडून 'संविधान' सर्वोत्कृष्ट शब्दाने गौरव

ऑक्सफर्ड डिक्शनरीकडून ‘संविधान’ सर्वोत्कृष्ट शब्दाने गौरव

Samvidhaan Oxford Dictionary,Samvidhaan, Oxford Dictionary,Oxford, Dictionary,Sanvidhaanनवी दिल्ली : ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘संविधान’ या शब्दाला २०१९  मधील सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून जाहीर केलं आहे. ‘संविधान’ या शब्दाने २०१९ मध्ये सर्वांचं लक्ष आकृष्ट केलं होतं.

२०१९ मध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या मूल्यांना संविधानाच्या कसोटीवर तपासलं गेलं. त्यामुळेच संविधान हा शब्द गेल्या वर्षी सर्वाधिक लोकप्रिय ठरल्याने आम्ही या शब्दाची सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून निवड करत आहोत, असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने (ओयूपी) म्हटलं आहे.

संविधान हा शब्द म्हटला तर शब्दही आहे आणि अभिव्यक्तीही आहे. या शब्दाने २०१९ मध्ये संपूर्ण देशवासियांचं लक्ष वेधून घेतलं. त्यातून लोकांच्या भावनाही व्यक्त झाल्या आहेत. मूलभूत सिद्धांताच्या एकत्रिकरणाने किंवा स्थापित दृष्टांतामुळे एक देश किंवा संघटन प्रस्थापित होते, असा संविधानाचा अर्थ असल्याचं ओयूपीने म्हटलं आहे.

या शब्दांचाही ऑक्सफर्डच्या शब्दकोशात समावेश…

जम्मू-काश्मीरला स्वायत्ता देणारं संविधानातील अनुच्छेद ३७० आणि (३५ ए) रद्द करण्यात आल्यानंतर संविधान हा शब्द व्यापक प्रमाणात वापरला जाऊ लागला. हे दोन्ही अनुच्छेद रद्द करण्यात आल्याने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जाही निघून गेला. संविधान हा अॅकेडमिक शब्द असतानाही २०१९ नंतर हा शब्द म्हणजे एक चळवळ बनला आहे, असं हिंदी लँग्वेज चॅम्पियन फॉर लँग्वेजजच्या कृतिका अग्रवाल यांनी सांगितलं. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या टीमने फेसबुक पेजवरून हिंदीचे शब्द सूचवण्याची मागणी केली होती. त्यावर लोकांनी प्रचंड प्रतिसाद देत ऑक्सफर्डला हजारो हिंदी शब्द सूचवण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments