Friday, March 29, 2024
Homeदेशपतंप्रधान मोदी आणि गोडसेंची एकच विचारधारा : राहुल गांधी

पतंप्रधान मोदी आणि गोडसेंची एकच विचारधारा : राहुल गांधी

rahul gandhi narendra modi maharashtra assembly election 2019नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेत काही फरख नाही. मोदींची आणि गोडसेंची विचारधारा एकच आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) विरोधात केरळच्या वायनाडमध्ये महारॅली आयोजित केली होती. या रॅलीनंतर झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते.

वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा मध्ये काँग्रेसच्यावतीने ‘संविधान बचाओ’ महारॅली काढण्यात आली. या महारॅलीचे नेतृत्व राहुल गांधी यांनी केले. या मार्चनंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मोदी यांच्यावर शरसंधान साधले. नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची एकच विचारधारा आहे. यात फारसे अंतर नाही. परंतु, मी गोडसे यांचा भक्त आहे, असे बोलण्याची नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.


नरेंद्र मोदी कोण आहेत…

राहुल गांधी या रॅलीत म्हणाले की, मी भारतीय आहे, यासाठी कोणीही सर्टिफिकेट देण्याची गरज नाही आहे. कोण भारतीय आहे. व कोण भारतीय नाही, हे सांगण्यापर्यंत नरेंद्र मोदी कोण आहेत. ज्यावेळी तुम्ही नरेंद्र मोदी यांना बेरोजगारी आणि नोकऱ्यांविषयी विचारले तर ते लोकांचे लक्ष हटवण्यासाठी दुसरा मुद्दा बोलतात, असे राहुल गांधी म्हणाले. काश्मीरमधील उद्धभलेली परिस्थिती आणि आसाममध्ये जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

कलपेट्टामध्ये एसकेएमजे हायस्कूल ते नवीव बस स्थानकापर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत संविधान बचाओ मार्च काढण्यात आला. या रॅलीत पार्टीचे ज्येष्ठ नेते ओमान चंडी, केसी वेणुगोपाल, विधानसभेचे विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीतला आणि प्रदेशाध्यक्ष एम. रामचंद्रन हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments