Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याबालदिनानिमित्त गूगलचं हे खास डूडल

बालदिनानिमित्त गूगलचं हे खास डूडल

Google celebrates Children's Day with a doodle
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं फार आवडायची. त्यामुळेच मुलंही त्यांना प्रेमाने चाचा नेहरु बोलतात. आज सर्च इंजिन गूगलही खास डूडलद्वारे बालदिन साजरा करत आहे.

रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण डूडल गुरुग्रामच्या दिव्यांशी सिंघलने तयार केलं आहे. ७ वर्षीय या विद्यार्थिनीची गूगल डूडल थीम ‘वॉकिंग ट्रीज’ आहे, जी पुढच्या पिढीला जंगलतोड वाचवण्याचा संदेश यातून देत आहेत. राष्ट्रीय विजेती दिव्यांशी सिंघलला ५ लाख रुपयांची कॉलेज स्कॉलरशिप आणि २ लाख रुपये शाळेच्या टेक्नोलॉजी पॅकेजसाठी मिळणार आहेत. इतर पुरस्कारांसोबतच तिला गूगलच्या भारतीय कार्यालयामध्ये भेट दिली जाणार आहे. देशभरात आज बालदिन साजरा केला जातो. मात्र, दिव्यांशीने जो संदेश दिला त्याबद्दल सर्वत्र तिचे कौतूक केलं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments