Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र'एल्गार' – ‘कोरेगाव भिमा’ प्रकरणी सरकार समांतर चौकशी करणार : नवाब मलिक

‘एल्गार’ – ‘कोरेगाव भिमा’ प्रकरणी सरकार समांतर चौकशी करणार : नवाब मलिक

Missing MLAs of NCP continue to return nawab malik

मुंबई : ‘एल्गार’ भिमा कोरेगाव परिषदेवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण सुरु आहे. या प्रकरणाची SIT चौकशी होणारच असं राष्ट्रवादीने जाहीर केलंय. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक झाली. त्यात पवारांनी राष्ट्रवादीकडे असलेल्या सर्व खात्यांचा आढावा घेतला. यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह १६ मंत्री उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले, NIAला या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यानुसारच मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतला असावा. मात्र NIAच्याच नियमांनुसार कलम १० अंतर्गत राज्य सरकारला समांतर चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार ही चौकशी होणारच आहे.

मलिक पुढे म्हणाले, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून SITचौकशीची मागणी केली होती. त्यानंतर चारच दिवसांनी केंद्राने NIAकडे चौकशी दिली. आता गृहमंत्रालय याबाबत निर्णय घेणार असून SIT च्या माध्यमातून समांतर चौकशी करणात येईल. या आधी शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमत नसल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर असा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे अशी पुस्तीही पवारांनी जोडली होती.

कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाविकास आघाडीमध्ये विसंवाद नाही…

महाविकास आघाडीमध्ये कोणताही विसंवाद नसल्याचा पुनरुच्चारही यावेळी मलिक यांनी केला. भाजपला सरकारमध्ये राहण्याचा रोग झाला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला.

एनपीआरबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र एनपीआरबाबत तिन्ही पक्षात चर्चा होणार, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने निवडणुकीपूर्वी जी आश्वासनं दिली होती, त्यावर चर्चा झाली. मंत्री आणि आमदारांनी जनतेसाठी कार्यालयात उपलब्ध राहावं, यासाठी पवारांनी मार्गदर्शन केल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments