Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्यारेल्वे स्थानकं, रेल्वे गाड्यांचं खाजगीकरणाचा सरकारचा घाट ?

रेल्वे स्थानकं, रेल्वे गाड्यांचं खाजगीकरणाचा सरकारचा घाट ?

indian Railway Privatisation
देशातील सहा विमानतळांच्या खाजगीकरणानंतर सरकार देशातील ५० रेल्वे स्थानकं आणि १५० रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणाचा सरकारचा घाट आहे. मात्र, याला विरोध होण्याची जोरदार शक्यता आहे.

खाजगीकरणासाठी सचिव स्तरावरील एका पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समोर आली आहे.

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी यासंदर्भात रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हि. के. यादव यांना पत्र पाठवले आहे. तसंच यामध्ये देशातील १५० रेल्वे गाड्या आणि ५० रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्याचं सुचवण्यात आलं आहे. किमान ५० रेल्वे स्थानकांवर या कामाची सुरूवात होणार आहे. ज्याप्रमाणे देशातील सहा विमानतळांचं खासगीकरण करण्यात आलं त्याच धर्तीवर काही रेल्वे स्थानकं आणि रेल्वे गाड्यांचं खासगीकरण करणं आवश्यक आहे. त्यासाठी सुरूवातीला १५० रेल्वे स्थानकांची निवड करून खाजगीकरण करण्याचं कांत यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे विरोध होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments