Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेश‘’आप’’च्या प्रचारासाठी ‘’लगे रहो, लगे रहो केजरीवाल’’ हे गीत ऐकलं का?....

‘’आप’’च्या प्रचारासाठी ‘’लगे रहो, लगे रहो केजरीवाल’’ हे गीत ऐकलं का?….

Arvind Kejriwal,Vishal Dadlani,Vishal Dadlani Arvind Kejriwal,Lage Raho Kejriwal,LageRaho Kejriwal,AAP, Delhi Assembly Election,Delhi Election,Assembly Election,Election,Election Result,Delhi,Election,Result

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान तर ११ ला निकाल येणार आहे. यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीच्या प्रचारासाठी “लगे रहो, लगे रहो केजरीवाल’’ हे गीत संगीतकार विशाल ददलानी यांनी तयार केलं आहे. त्यामुळे प्रचारात त्या गिताची जोरदार चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडीओ ट्विट केलं. त्यामध्ये सांगितले. माझे मित्र पार्श्वगायक, संगीत निर्देशक आणि संगीतकार विशाल ददलानी यांनी आम आदमी पार्टीच्या प्रचारासाठी “लगे रहो, लगे रहो केजरीवाल’’ हे गीत तयार केलं आहे. ते तुम्ही जरूर ऐका आणि शेयर करा असं सांगितलं आहे.

सध्या दिल्लीमध्ये प्रचाराने जोर धरला आहे. दिल्लीमध्ये कडाक्याची थंडी आहे. परंतु राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा काबीज करण्यासाठी आम आदमी पार्टीसह भाजप, काँग्रेस व इतर पक्षांनी संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दिल्लीचा मतदार राज केजरीवाल सरकारला पुन्हा संधी देणार की नवा पर्याय निवडणार हे ११ फेब्रुवारीला स्पष्ट होईल. त्यामुळे सध्यातरी प्रचाराला वेग आल्याचे दिसून येत आहे.

“लगे रहो, लगे रहो केजरीवाल’’ मतदारांना किती स्पर्श करणार…

संगीतकार विशाल ददलानी यांनी आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी तयार केलेलं “लगे रहो, लगे रहो’’ हे गीत कीती पचणी पडतो. त्याचा किती प्रभाव मतदारांना आकर्षण करण्यात यशस्वी होणार यावर बरंच काही अवलंबून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments