Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईदेशद्रोहाचा आरोप; उर्वशी चुडावालाला हायकोर्टाचा दिलासा

देशद्रोहाचा आरोप; उर्वशी चुडावालाला हायकोर्टाचा दिलासा

Urvashi Chudawala,Urvashi, Chudawala,मुंबई : ‘जेएनयू’चा अटकेत असलेला विद्यार्थी शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानं अडचणीत सापडलेली ‘टिस’ची विद्यार्थिनी उर्वशी चुडावालाला आज मंगळवार (११ फेब्रुवारी) मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. उर्वशीला अटक केल्यास २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे अंतरिम आदेशही पोलिसांना दिले.

देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यानं उर्वशी अडचणीत सापडली होती. तिनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उर्वशीनं अर्ज केला होता. त्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टानं उर्वशीला दिलासा दिला आहे. तिला अटक केल्यास २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्याचे अंतरिम आदेश पोलिसांना दिले आहेत. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आणि नंतर पोलीस बोलावतील, तेव्हा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश कोर्टानं उर्वशीला दिले.

देशद्रोहाच्या आरोपाबद्दलचे कलम लावण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले का?

देशद्रोहाच्या आरोपाबद्दलचे कलम लावण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले का? अशी विचारणा उच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान केली. त्यावर मार्गदर्शक तत्त्वांनुसार विधी अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतला नसल्याचं उत्तर सरकारी वकिलांनी दिलं. त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी उर्वशीला अंतरिम दिलासा देत सुनावणी तहकूब केली. कोर्टाच्या परवानगीविना मुंबई आणि ठाण्याबाहेर जाऊ नये, अशी अटही कोर्टानं उर्वशीला घातली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments