Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याहैदराबाद : आरोपींची हत्या की एन्काऊंटर?

हैदराबाद : आरोपींची हत्या की एन्काऊंटर?

hyderabad four accused in hyderabad rape and murder case killed in encounter with policeहैदराबाद : हैदराबाद बलात्कार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात असलेल्या ४ आरोपींचा एन्काऊंटर केला. परंतु हा एन्काऊंटर आहे की हत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरकारी वकिल उज्वल निकम यांनीही या प्रकरणी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संशय उपस्थित केलं आहे. घडलेला प्रकार चुकीचा आहे असेही निकम यांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणातील हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या. ही घटना आज (शुक्रवार) पहाटे ३ वाजता घडली. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

 हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुरोरा दिला आहे. तपासादरम्यान या ४ आरोपींना पोलीस घटनास्थळी नेत होते. मात्र, दरम्यानच्या काळात हे चारही आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत होते. त्यानंतर पोलिसांनी या चौघांनाही थांबवण्यचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना दाद देत नसल्याचे पाहून शेवटी पोलिसांनी चौघांवर गोळ्या झाडल्या. यात या चौघांचा मृत्यू झाला. आरोपींनी पोलिसांच्या हातातील शस्त्रे खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती तेलंगणचे कायदेमंत्री इंद्रकरण रेड्डी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments