Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमी ओसामा बिन लादेनशी बोललो, मनसे नेत्याने राऊतांची उडवली खिल्ली!

मी ओसामा बिन लादेनशी बोललो, मनसे नेत्याने राऊतांची उडवली खिल्ली!

Sanjay Raut Sandeep Deshpande,Sanjay Raut, Sandeep Deshpande,Sanjay, Raut, Sandeep, Deshpande,MNS,Maharashtra Navnirman Sena,Shiv Sena

मुंबई : क्राईम रिपोर्टींग करत असताना मी दाऊद इब्राहिमला भेटलो, दम भरला. असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला होता. त्याची मनसेकडून खिल्ली उडवण्यात आली. मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो, आणि त्याला ९/११ नंतर दम पण दिला होता. असं ट्वीट मनसे नेते माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एका दैनिकाच्या कार्यक्रमात मुलाखत दिली. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले मी, क्राईम रिपोर्टींग करताना दाऊद इब्राहीमला भेटलो. सोबत फोटोही काढला आणि दमही दिला होता. असा गौप्यस्फोट बुधवारी (१५ जानेवारी) पुणे येथे केला होता. त्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन राऊतांची खिल्ली उडवली. तर दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात संजय राऊतांबद्दल त्या विधानावरून तक्रार केली आहे.

दिलदार राजाकडूनतुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती…

राज ठाकरे हे शिवसेनेत बाहेर पडल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मी राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेले होतो. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली होती. असं विधान राऊत यांनी मुलाखतीत केलं होतं. त्याला मनसेनेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं.

आणि हो, ज्या महाराष्ट्र सैनिकांनी तुमची गाडी जाळली होती, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या “दिलदार राजाकडून” तुम्ही नवी कोरी गाडी देखील घेतली होती’ असं उत्तर दिलं. संदीप देशपांडेंनी राऊतांना लगावला आहे. त्यापुढे ‘फेकाडासामनेवाला’ असा हॅशटॅग लावला.

काय म्हणाले होते संजय राऊत…

राज ठाकरे यांचं राज्य छोटं असलं, तरी ते त्या राज्याचे राजे आहेत. तुमचं राज्य खालसा करा, असं आम्ही कसं म्हणणार? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता.

राज ठाकरे आजही आपले मित्र आहेत. त्यांनी पक्ष स्थापन केला आहे. त्यांचं ते बघतील. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, आमचं सरकार आहे. मी त्यावेळी त्यांना सांगायला गेलो होतो, असा वेगळा विचार करु नका, पण त्यावेळी गाडी जाळली गेली. राज ठाकरे यांना त्यावेळी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र आज त्यांचा पक्ष थांबला, असंही राऊत म्हणाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments