Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशमायावती म्हणाल्या अदनाम सामीला पद्मश्री मग् पाकिस्तानातील मुस्लिमांना नागरिकत्व का नाही?

मायावती म्हणाल्या अदनाम सामीला पद्मश्री मग् पाकिस्तानातील मुस्लिमांना नागरिकत्व का नाही?

Mayawati Narendra Modi,Mayawati, Narendra Modi,Mayawati Modi, Narendra, Modiलखनौ : अदनान सामीला भारतात पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो तर पाकिस्तानी मुस्लिमांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) अंतर्गत आश्रय का देऊ शकत नाहीत. असा सवाल बसपा प्रमुख माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) वरून देशात गोंधळ सुरु आहे. मायावती यांनी मंगळवारी सीएएवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. अदनान सामीला भारतात पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो तर पाकिस्तानी मुस्लिमांना नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) अंतर्गत आश्रय का देऊ शकत नाहीत. असा सवाल त्यांनी केला आहे.

जर मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या अदनान सामीला भारतात पद्मश्री पुरस्कार मिळू शकते तर पाकिस्तानात अत्याचार होत होत असलेल्या पाकिस्तानी मुस्लिमांना हिंदू, शीख आणि ख्रिश्चन यांच्याप्रमाणे सीएए अंतर्गत आश्रय का देऊ शकत नाहीत. केंद्र सरकारने पुन्हा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर फेरविचार केला तर बरे होईल असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अदनान सामीला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मनसेनं देखील विरोध केला होता. अदनान सामी यांचा जन्म लंडनमध्ये झाला असून, त्यांचे वडील पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये वैमानिक होते. अदनाननं २०१५ मध्ये भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व देण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments