Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशइम्रान खानचा नरेंद्र मोदी - अमित शाहांवर हल्लाबोल

इम्रान खानचा नरेंद्र मोदी – अमित शाहांवर हल्लाबोल

Imran Khanनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे पक्षपाती असून शेजारील देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो शेअर करत टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्र या धोरणाच्या दिशेने ही वाटचाल असल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मध्यरात्री एक वक्तव्य जारी केलं, ज्यात म्हटलं आहे की, ‘आम्ही या विधेयकाचा निषेध करतो. हे विधेयक भेदभाव आणि सर्व आंतरराष्ट्रीय करार-कायद्यांचं उल्लंघन करणारं आहे. शेजारील देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे.’ शेजारील देशात छळ सहन करावा लागलेल्या अल्पसंख्यांकांचं भारत घर असल्याचा दावाही आम्ही फेटाळतो, असंही या वक्तव्यात म्हटलं आहे.

लोकसभेत मंजूर झालेलं विधेयक भारत आणि पाकिस्तान यांच्यात अल्पसंख्यांकांचं संरक्षण आणि अधिकार यांवर झालेले करार आणि इतर द्विपक्षीय करारांचंही उल्लंघन असल्याचा आरोप पाकिस्तानने केला. भारत सरकारने आणलेलं विधेयक हिंदू राष्ट्र होण्याच्या दिशेने पाऊल आहे. हिंदुत्ववादी विचाराधारेने मोठ्या काळापासून हे ध्येय ठेवलं होतं, असंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

इम्रान खान यांचं ट्वीट…

इम्रान खान यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये भारत-पाकिस्तानमधील एका द्विपक्षीय कराराचा दाखला दिला आहे. १९५० मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यात हा करार झाला होता. या कराराचं भारताने गांभीर्याने पालन केलं, पण पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांवर अन्याय होत राहिले, असं गृहमंत्री अमित शाह लोकसभेत म्हणाले होते. पाकिस्तानमध्ये गेल्या ७२ वर्षात अल्पसंख्यांकांची संख्या वेगाने घटली, तर भारतात उलट चित्र आहे, असं ते म्हणाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments