Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईनवी मुंबईत भाजपला धक्का, ‘ते’ नगरसेवक स्वगृही राष्ट्रवादीत परतणार

नवी मुंबईत भाजपला धक्का, ‘ते’ नगरसेवक स्वगृही राष्ट्रवादीत परतणार

Sharad Pawar Ganesh Naik,Sharad Pawar, Ganesh Naik,Sharad, Pawar, Ganesh, Naik,Navi Mumbai,Navi Mumbai Municipal Corporation,NMMC,Municipal Corporationमुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणूका शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीतर्फे लढवणार आहे. त्यामुळे भाजपच्या तंबूत घबराट पसरली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे गणेश नाईक समर्थक नगरसेवक पुन्हा स्वगृही परतणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

गणेश नाईक यांच्यासह ५० राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. नवी मुंबईतल्या भाजप नगरसेवकांनी काल बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मंत्रालयात अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर असल्याने या भेटीला अधिक महत्त्व आहे.

प्रभागातील बदललेल्या परिस्थितीमुळे भाजप नगरसेवकांनी महाविकास आघाडीचा धसका घेतल्याची चर्चा आहे. पाच जण शिवसेनेत तर सहा जण राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या गणेश नाईक यांच्यासोबत त्यांचे समर्थक नगरसेवक भाजप सोडून वर्षभरातच राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याच्या चर्चा सुरु होती.

दरम्यान, आमचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही. ‘फेव्हिकॉल’च्या जोडप्रमाणे सगळे मजबूत एकत्र आहेत. सर्व नगरसेवक भाजपसोबत आहेत. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे काही पदाधिकारी पब्लिसिटीसाठी अशी कामं करतात, असा दावा नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केला होता.

महापालिका निवडणूक ‘एक वॉर्ड, एक नगरसेवक’ या पद्धतीने घेण्याविषयी महाविकास आघाडी सरकारने याआधीच निर्णय घेतला आहे. याआधी वॉर्ड स्तरावर आढावा बैठक घेण्यात आली होती. निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर सहकारी पक्ष एकत्रितपणे येऊन प्रत्येक प्रभागात एकच उमेदवार देणार आहेत.

सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत संदेश देण्यासाठी आणि निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी आणि  कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments