Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्यानंतर मनपा ठेकेदारांवर आयकरचे छापे

शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्यानंतर मनपा ठेकेदारांवर आयकरचे छापे

Income tax raids on Municipal contractors after Shiv Sena split with BJP
मुंबई : शिवसेना व भाजप यांच्यात सत्तावाटपावरून शिवसेनेने भाजपची साथ सोडली. त्यानंतर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या अत्यंत जवळच्या कंत्राटदार कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले आहेत. मुंबई आणि सुरत येथे हे छापे टाकण्यात आले. त्यात मुंबई महापालिका कंत्राटदारांचाही समावेश आहे. एकूण ३७ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहे.

याप्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याची माहिती समोर येत आहेत. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयही (ईडी) या कंत्राट कंपन्यांवर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाने ७३५ कोटींच्या बनावट नोंदी आणि बनावट खर्चाचे पुरावे सापडल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला सापडल्याची माहिती समोर येत आहे.

आरपीएस इन्फ्रा ग्रुप, वन वर्ल्ड्र टेक्स्टाईल ग्रुप व स्कायवे अँड रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट यांच्या कार्यालयांवर छापे पडले होते. गुरुवारी इंडियन इन्फोटेक अँड सोफ्टवेअर लिमिटेड या कंपनीवर छापे टाकले आहेत. या धाडीमुळे संबंधित कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृत कोणाताही खुलासा करण्यात आला नाही.

एकूण ३७ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून सात ठिकाणांचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. प्राप्तिकरात अनियमितता केल्याच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने मागच्या आठवड्यात काही कंत्राटदारांच्या ठिकाणांवर शोधमोहीम राबवली होती. या सर्व प्रकरणांमुळे वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments