Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्यापाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराचे सडेतोड उत्तर

पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराचे सडेतोड उत्तर

indian army has given-the response to pakistan
जम्मू-काश्मीर: पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत कुपवाडा परिसरात गोळीबार केला होता. जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य भारतात घुसणाऱ्या घुसखोरांना मदत करत होते.पाकिस्तानच्या या गोळीबारात दोन जवान शहीद झाले होते. तर एका स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय जवानांनी तंगधार सेक्टरमधून तोफांना मारा केला. भारताच्या या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक लाँच पॅड उद्ध्वस्त झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून काल (शनिवारी) रात्री झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात लष्कराच्या एका पोस्टचं मोठं नुकसान झालं होत. याशिवाय दोन घरं आणि गाड्यांचं नुकसान झालं होते. या सोबतच तीन नागरिक या गोळीबारात जखमी झाले होते.

पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबाराला भारताने देखील चोख उत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने सीमेपलिकडून गोळीबार करण्याचे प्रमाण वाढवले आहे.

पाकिस्तानने 15 ऑक्टोबरलाही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. त्यावेळीही भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यावर्षी पाकिस्तानने आतापर्यंत 2300 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. तर गेल्यावर्षी हा आकडा 1629 होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments