Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईहिंगणघाटच्या त्या पीडितेसाठी उद्योगपती आनंद महिंद्रांचा पुढाकार

हिंगणघाटच्या त्या पीडितेसाठी उद्योगपती आनंद महिंद्रांचा पुढाकार

Anand Mahindra Wardha,Anand Mahindra, Wardha,Anand, Mahindra, Mahindra Wardha,Anand Wardha

मुंबई : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित प्राध्यापीका तरुणीची मृत्यूशी झुंज सुरु आहे. तरुणीच्या उपचारांचा खर्च उचलण्याची तयारी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दाखवली आहे.’पीडित तरुणीला वा तिच्या कुटुंबीयांना कुणी ओळखत असतील कृपया त्यांची माहिती मला द्या,’ असं आवाहन आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

एकतर्फी प्रेमातून विक्की नगराळे या माथेफिरूनं ३ फेब्रुवारी रोजी हिंगणघाट येथील शिक्षण तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं होतं. पीडित तरुणी कॉलेजच्या दिशेनं जात असताना नगराळे यानं हा हल्ला केला होता. त्यात ही तरुणी बरीच भाजली आहे. तिच्यावर सध्या नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून शर्थीचे प्रयत्न करत आहे. या घटनेमुळं राज्यभरात संताप आहे. पीडित तरुणीच्या प्रकृतीसाठी ठिकठिकाणी प्रार्थना होत असून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी मोर्चे, निदर्शनं सुरू आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीमधून तरुणीच्या उपचाराचा खर्च उचलला आहे.

मला केवळ वर्तमानपत्राचं पान उलटून पुढं जायचं नाही

या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी हिंगणघाट घटनेवर भाष्य केलं आहे. ‘ही क्रूरता कल्पनेच्या पलीकडची आहे. एक आयुष्य उद्ध्वस्त झालंय. वर्तमानपत्रात या संदर्भातील बातमी वाचून सहज पान उलटणं ही त्यापेक्षाही मोठी क्रूरता आहे. तिचं कुटुंब तिच्या उपचारांचा कसा भागवत असेल, हा प्रश्न मला पडलाय. कुणालाही या तरुणीबद्दल वा तिच्या कुटुंबीयांबद्दल काही माहिती असेल तर कृपया मला कळवा. मला केवळ वर्तमानपत्राचं पान उलटून पुढं जायचं नाही,’ असं मार्मिक ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे.

‘हिंगणघाटच्या पीडितेसाठी सामूहिक निधी उभारण्याचा प्रयत्न व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. जेणेकरून अशा गुन्ह्यांत बळी ठरलेल्या अन्य पीडितांनाही मदत देता येईल,’ असंही त्यांनी ट्विटमध्ये पुढं म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments