Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeक्रीडाipl 2020 : मुंबईत ‘या’ तारखेला फायनल मॅच!

ipl 2020 : मुंबईत ‘या’ तारखेला फायनल मॅच!

IPL T20,IPL 2020 auction,T20,IPL

मुंबई : इंडियन प्रिमीयर लीग (ipl 2020) ही स्पर्धा २९ मार्च पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना फायनल मॅच २४ मे रोजी मुंबईत होणार आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामादरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची उपस्थिती होती. तसंच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. (ipl 2020) मध्ये फक्त पाच दिवस दोन सामने खेळवले जाणार आहेत. तर डे-नाईट सामना ८ वाजता सुरु होईल. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मुंबईला मिळालेला आहे. सोमवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याबद्दल निर्णय घेण्यात आला.

याचसोबत बैठकीत सामन्यांची वेळ रात्री ८ हीच कायम ठेवण्यात आलेली आहे. काही संघमालकांनी सामने रात्री साडेसात वाजता सुरु करावे अशी मागणी केली होती, मात्र बैठकीत वेळेत कोणताही बदल न करण्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

Double Header सामन्यांची संख्याही यंदाच्या हंगामात कमी करण्यात आलेली असून, या हंगामात केवळ ५ Double Header सामने होतील. “आयपीएल सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. आधीप्रमाणेच सामने रात्री ८ वाजता सुरु होतील. रात्री साडेसात वाजता सामने सुरु करण्याबद्दल चर्चा झाली, पण त्यावर एकमत झालेलं नाही. आयपीएलचा अंतिम सामना २४ मे रोजी मुंबईत खेळवला जाईल, आणि यंदाच्या हंगामात केवळ ५ Double Header सामने असतील.” बीसीसआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पत्रकारांना माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments