Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeविदर्भअमरावतीआयपीएस अधिकारी देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी निलंबित

आयपीएस अधिकारी देशद्रोहाच्या आरोपप्रकरणी निलंबित

Ab Venkateshwara Rao,AB Venkateshwara, Rao,Venkateshwara Rao,Ab Raoअमरावती : एका संरक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका इस्राइली कंपनीसाठी आयपीएस अधिका-याने गुप्तहेरगिरी केली. या अधिका-याला देशद्रोहाच्या आरोपाखाली एबी वेंकटेश्वर राव या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस महासंचालकपदाच्या रॅंकवर कार्यरत असणाऱ्या एबी वेंकटेश्वर राव यांच्यावर ही कारवाई झाली. आंध्र प्रदेशच्या मुख्य सचिव नीलम सहानी यांनी डीजीपी गौतम सवांग यांच्या अहवालाच्या आधारे राव यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याला सरकारच्या परवानगीशिवाय विजयवाडा सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

गोपनीय अहवालानुसार, मागील सरकारच्या कार्यकाळात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदावर (गुप्तचर) काम करत असताना राव यांनी त्यांचा मुलगा आणि अकासम अॅडव्हान्स सिस्टम्स प्राइव्हेट लिमिटेडचे सीईओ चेतन साई कृष्णा यांना बेकायदेशीरपणे महत्त्वाच्या गुप्त आणि सुरक्षेशी संबंधित काम देण्यात आले. यामध्ये इस्राइलची संरक्षण क्षेत्रातील उपकरण उत्पादन करणारी कंपनी आर.टी. इंफ्लाटेबल्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत एकत्र काम केले.

अहवालानुसार, आरोपी अधिकारी आणि परदेशी कंपनी यांच्यात उघडपणे संबंध असल्याचे दिसते. हा प्रकार नैतिक आचारसंहिता आणि अखिल भारतीय सेवा नियम, १९६८ चा नियम (३) (ए) चे उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले.

राज्य, राष्ट्रविरोधी कृत्य

निलंबित अधिकारी राव यांच्या वर्तनामुळे राज्य, राष्ट्रविरोधी कृत्य झाले असून सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण झाला असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याजवळचे मानले जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments