इराण-इराक भूकंप; मृतांची संख्‍या ४५० वर

- Advertisement -

महत्वाचे…
१. मृतांची संख्या आता पर्यंत ४५०,संख्या वाढण्याची शक्यता २. सात हजाराहून अधिक लोक जखमी ३.७.३ रिश्टर स्केल भूकंप झाला. ३. दोन्ही देशांतील अनेक गावे उद्ध्वस्त


तेहरान : इराण-इराक सीमेवर रविवारी रात्री झालेल्या भूकंपातील मृतांची संख्‍या ४५० वर पोहोचली आहे. तर सात हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. येथे अद्‍यापही बचाव कार्य सुरु असून मृतांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे. येथे ७.३ रिश्‍टर स्‍केल भूकंप झाला. दोन्ही देशांतील अनेक गावे उद्ध्वस्त झाली असून मृतांमध्ये प्रामुख्याने डोंगराळ भागात असलेल्या  गावातील शेतकर्‍यांचा समावेश आहे.  भूकंपामुळे अनेक ठिकाणी जमीन खचली असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

- Advertisement -