Friday, March 29, 2024
Homeदेश'चांद्रयान-3' ला सरकारची मंजूरी

‘चांद्रयान-3’ ला सरकारची मंजूरी

 isro chief k sivan 2020 will be the year of chandrayaan 3 and gaganyaanभारताच्या महत्वपूर्ण ‘चांद्रयान-2’ मोहिमेनंतर भारताच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेला म्हणजेच ‘चांद्रयान-3’ ला केंद्र सरकारने मंजूरी दिली. ही माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी बुधवारी दिली. चांद्रयान-३ च्या पूर्वतयारीचे काम सध्या जोरदार सुरू असल्याचे सिवन यांनी स्पष्ट केले. ही चांद्रमोहिम २०२० मध्येच आखण्यात येणार असल्याचे मंगळवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले होते.

‘चांद्रयान-3’ मोहिमेबद्दल के. सिवण म्हणले की…

चांद्रयान-२ प्रमाणेच चांद्रयान-३ ही मोहिम असेल. दोन्हींमध्ये फार मोठा फरक नसणार आहे . चांद्रयान-२ मध्ये ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर होते. चांद्रयान-३ मध्ये प्रॉप्लशन मोड्यूलच्या साह्याने लँडिंगच आणि रोव्हरचे काम चालेल, असे त्यांनी सांगितले. इस्रोसाठी हे संपूर्ण 2020 वर्ष विविध कार्यक्रमांचे असेल, असेही सिवण यांनी सांगितले.

2020 हे वर्ष इस्रोसाठी ‘चांद्रयान-३’ आणि ‘गगनयान’ या दोन महत्त्वपूर्ण मोहिमांचे असेल. 2019 मध्ये आम्ही गगनयान मोहिमेसंदर्भात चांगली प्रगती केली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून या मोहिमेतील अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. इस्रोकडून अंतराळात मनुष्य पाठविण्याची गगनयान ही पहिलीच मोहिम असेल. 2022 मध्ये गगनयानचे प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे. एकूण चार अंतराळवीरांना या मोहिमेतून अंतराळात पाठवून त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यात येणार आहे, असे ही के. सिवन यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments