Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसूर्यग्रहणासारखं देशाला भाजप, आरएसएसचं ग्रहण : प्रकाश आंबेडकर

सूर्यग्रहणासारखं देशाला भाजप, आरएसएसचं ग्रहण : प्रकाश आंबेडकर

Mohan Bhagwat Narendra Modi Prakash Ambedkar,Mohan, Bhagwat, Narendra, Modi, Prakash, Ambedkar

मुंबई : ज्याप्रमाणे सूर्याला ग्रहण लागलं आहे, त्याचप्रमाणे देशालाही ग्रहण लागलं आहे. हे ग्रहण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचं आहे,’ अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्रं सोडलं आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा व एनआरसीच्या अंमलबजावणीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईच्या दादर येथील खोदादाद सर्कल येथे आज गुरुवारी आंदोलनाचे होत आहे. त्यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एका वृत्तवाहिन्यांशी बोलताना केंद्र सरकार जोरदार टीका केली. देशाच्या आर्थिक स्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारनं सीएए व एनआरसी हे मुद्दे उकरून काढले आहेत. त्यांचा फटका केवळ मुस्लिमांना नव्हे तर देशातील हिंदूंनाही बसणार आहे. तब्बल ४० टक्के हिंदू या कायद्यामुळं बाधित होणार आहेत,’ असं ते म्हणाले.

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात भटके-विमुक्त मोठ्या संख्येनं भटके-विमुक्त सहभागी होणार आहेत. हे लोक रुढीपरंपरांच्या ‘डिटेन्शन’मधून बाहेर आले असले तरी अजूनही त्यातील अनेकांचा संसार गाढव व घोड्याच्या पाठीवर सुरू आहे. नव्या कायद्यामुळं ते पुन्हा एकदा ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ढकलले जाणार आहेत,’ असं ते म्हणाले.

सीएए व एनआरसीच्या मुद्द्यावर मोदी, शहा खोटे बोलत आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण, आरएसएस ही संघटनाच खोटेपणाच्या पायावर उभी आहे. एनआरसीबाबत कोणताही निर्णय झाला नाही, असं आता मोदी सांगत असतील तर मग संसदेत त्याची घोषणा कशी काय केली गेली, असा प्रश्नही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments