Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशज्योतिरादित्य शिंदेची नेमप्लेट काँग्रेस कार्यालयातून हटवली

ज्योतिरादित्य शिंदेची नेमप्लेट काँग्रेस कार्यालयातून हटवली

Jyotiraditya Scindia NamePlate,Jyotiraditya Scindia, NamePlate, Scindia NamePlate,Jyotiraditya  NamePlateभोपाळ : मध्यप्रदेशातील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला मंगळवारी सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज काँग्रेसच्या कार्यालयातून त्यांच्या नावाची नेमप्लेट आज बुधवारी हटविण्यात आली. शिंदे आज भाजपात प्रवेश करणार आहेत.

शिंदे यांनी मंगळवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवून केंद्रात मंत्रिपद दिले जाणार अशी शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा बुधवारी केली जाऊ शकते. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या सरकारमधील १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे. कमलनाथ सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे भाजप मध्यप्रदेशमध्य सरकार स्थापन करेलं हे जवळपास निश्चित आहे.

कुणाचे आमदार कुठे?

मध्य प्रदेशात वाढत्या राजकीय हालचाली पाहता भाजपने आपल्या १०५ आमदारांना भोपाळमधून इतरत्र रवाना केले आहे. त्यामध्ये ८- ८ आमदारांचे गट तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक गटातील एकाला ग्रुप लीडर करण्यात आले. हाच नेता आपल्या गटातील आमदारांवर नजर ठेवणार आहे. या सर्वच गटांना वेग-वेगळ्या वाहनांमध्ये दिल्ली, मानेसर आणि गुडगाव अशा विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे, सिंधिया समर्थक आमदार बुधवारी बंगळुरू येथून आणले जातील. मध्य प्रदेश विधानसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला तेव्हाच या आमदारांना भोपाळला नेले जाणार आहे. अन्यथा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अर्थात २६ मार्च रोजी भोपाळला बोलावले जाईल. सोबतच, भोपाळच्या बड्या नेत्यांचे दिल्ली दौरे अचानक वाढले आहेत. केंद्रीय मंत्री प्रह्लाद पटेल आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत.

हे आमदार सध्या बंगळुरूत

बंगळुरूमध्ये थांबलेल्या शिंदे समर्थक आमदारांना बुधवारी बंगळुरूतून दुसरीकडे हलवले जाणार आहे. यामध्ये आमदार प्रदुम्न सिंह तोमर, रघुराज कंसाना, कमलेश जाटव, रक्षा सरोनिया, जजपाल सिंह जज्जी, इमरती देवी, प्रभुराम चौधरी, तुलसी सिलावट, सुरेश धाकड, महेंद्र सिंह सिसोदिया, ओपीएस भदौरिया, रणवीर जाटव, गिर्राज दंडोतिया, यशवंत जाटव, गोविंद सिंह राजपूत, हरदीप डंग, मुन्ना लाल गोयल तसेच ब्रिजेंद्र यादव यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments