Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटक सरकारचे भवितव्य पोटनिवडणुकीच्या निकालावर अवलंबून

कर्नाटक सरकारचे भवितव्य पोटनिवडणुकीच्या निकालावर अवलंबून

Karnataka bye-polls 15 Assembly seats vote todayबंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या 15 मतदारसंघात आज गुरुवारी पोटनिवडणूक होत आहे. 15 जागांसाठी 165 जण आपले नशीब आजमावत आहेत. 15 पैकी 8 जागा भाजपने जिकंल्या तरच कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार वाचू शकेल. यासाठी कर्नाटकात आज भाजपची खरी अग्नी परीक्षा आहे.

कर्नाटकात राजकीय ड्राम्यानंतर सत्तापालट झाली होती. त्यानंतर विधानसभेचे सभापती रमेश कुमार यांनी जुलै 2019 मध्ये काँग्रेस- जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले होते. तर तीन आमदरांना निलंबित करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी 17 जणांना अपात्र ठरवत निवडणूक लढण्यास मज्जाव केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात निकाल देताना या 17 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवताना त्यांना दिलासा दिला होता. हे आमदार पुन्हा निवडणूक लढवू शकतील असं नमूद केलं होतं.

काँग्रेस, जेडीएसच्या अपात्र आमदारांना भाजपने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेस-जेडीएसची युती तुटल्याने 15 फुटीर आमदारांना पराभूत करण्याचा चंग दोन्ही पक्षांनी बांधला आहे. दुसरीकडे या आमदारांना निवडून आणण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली आहे. मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अपात्र आमदारांच्या विजयासाठी सर्व मतदारसंघात प्रचार सभा आणि रोड शो करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. येडीयुरप्पा यांनी गेल्या दोन आठवड्यात 15 मतदारसंघात प्रचार केला असून, पाच हजार किलोमीटरचा प्रवास केला.

या सर्व पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या निकालावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सत्ताधारी भाजपला किमान आठ जागा जिंकाव्या लागणार असून, त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनेही जोर लावला आहे.

या मतदारसंघात मतदान…

गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर, यल्लापूर या मतदारसंघात आज मतदान होत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक…

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली होती. मात्र काँग्रेस. जेडीएसचे आमदार फुटल्याने सत्तापरिवर्तन झालं आहे.

कर्नाटकातील पक्षीय बलाबल…

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष, भाजप 104 असं संख्याबळ आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी पोटनिवडणुकीत 8 जागा जिंकणे आवश्यक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments