Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशदिल्ली हिंसाचार : केजरीवालांची राजघाटावर शांततेसाठी प्रार्थना!

दिल्ली हिंसाचार : केजरीवालांची राजघाटावर शांततेसाठी प्रार्थना!

Arvind Kejriwal RajGhat,Arvind Kejriwal, RajGhat,Arvind, Kejriwal, नवी दिल्ली : दिल्लीत सध्या सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) विरोधात आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे हिंसाचार घडत आहे. सलग तीन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी हिंसाचार सुरु आहे. दरम्यान, सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सहकार्यांसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावर जाऊन प्रार्थना केली.

केजरीवाल म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देश काळजीत आहे. या हिंसाचारामध्ये लोकांचे बळी गेले असून मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. जर हा हिंसाचार वाढला तर त्याचा परिणाम हा प्रत्येकावर होणार आहे. त्यामुळे आपण सर्वजण जे अहिंसेचे समर्थक आहोत ते येथे गांधीजींच्या स्मृतीस्थळाजवळ प्रार्थना करणार आहोत.”


जखमींची केली विचारपुस…

दरम्यान, राजघाटावर अहिंसेचा संदेश देणाऱ्या गांधींजींना अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात पोहोचले. इथे शहरातील हिंसाचारात जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार सुरु आहेत. या नागरिकांची त्यांनी भेट घेतली आणि विचारपूस केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments