Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांविरोधात किरीट सोमय्यांची पोलिसांकडे तक्रार

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांविरोधात किरीट सोमय्यांची पोलिसांकडे तक्रार

Jitendra Awhad Kirit Somaiya,Jitendra, Awhad, Kirit, Somaiyaमुंबई : जेएनयू प्रकरणी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला होता. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही यावर आक्षेप घेतला होता. कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

जेएनयूमध्ये गुंडांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले. गुंडांनी विद्यार्थी वसतिगृहासह साहित्याचेही नुकसान केलं. या घटनेनंतर देशातील इतर शहरांमध्ये याविरोधात निषेधाची प्रतिक्रिया उमटली. जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थी, कलाकारांसह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी झाले होते.

गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याचा आरोप भाजपानं केला होता. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही यावर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्या. असा आक्षेप सोमय्या यांनी घेतला होता. आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आलं असाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री आव्हाडांविरोधात तक्रार देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments