Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर बिनविरोध

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर बिनविरोध

Kishori Pednekar unopposed as mayor of Mumbai
मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदी नगरसेविका किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पेडणेकर आक्रमक नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे.

येत्या २२ नोव्हेंबर रोजी महापौरपदाची निवडणूक होणार होती परंतु, किशोरी पेडणेकर आणि सुहास वाडकर यांच्याशिवाय कुणाचेही अर्ज आले नव्हते. मुंबईचं महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव झाल्याने या पदासाठी शिवसेनेतील अनेक नगरसेवकांनी लॉबिंग सुरू केली होती. काही नगरसेवकांनी सेटिंग लावण्याचेही प्रयत्न केले होते. मंगेश सातमकर, यशवंत जाधव, विद्यमान सभागृह नेत्या विशाखा राऊत, शीतल म्हात्रे, बाळा नर, रमाकांत रहाटे, सुजाता पाटेकर आदी नगरसेवकांनी महापौरपदासाठी शर्यतीत होते. किशोरी पेडणेकर यांनी मात केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments