Video : टीक टॉक व्हिडीओ करताना मृत्यूचा लाईव्ह थरार

- Advertisement -
Suicide Dead Body
Representational Image

मुजफ्फरनगर : टीक टॉकचा ट्रेंड जोरात सुरु आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुणानं पोहोण्यासाठी पाण्यात उडी मारल्यानंतर त्याचा मृतदेहच वर आल्यानं सर्वांनाच धक्का बसला. पाण्यात उडी मारल्यानंतर त्याचं डोकं दगडावर आदळलं असाव असं सांगितलं जात आहे.

 

व्हिडीओमध्ये तरुण आपला जीव धोक्यात घालून व्हिडीओ तयार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आपला शेवटचा ठरेल आणि आपल्याचं मृत्यूचा खेळ असा कॅमेऱ्यात कैद होईल याची पुसटशी कल्पनाही या तरुणाला नव्हती. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर इथे टीक टॉक व्हिडीओ तयार करताना तरुणाच्या मृत्यूचा लाईव्ह थरार कॅमेऱ्यात कैद झाला. तरुणानं पोहोण्यासाठी पाण्यात उडी मारल्यानंतर त्याचा मृतदेहच वर आल्यानं टीक टॉक व्हिडीओ तयार करणा-याही मित्राला धक्का बसला आहे. ह्या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

- Advertisement -

पाण्यात उडी मारल्यानंतर त्याचं डोकं दगडावर आदळलं…

तरुणासोबत काही मित्रही तिथे उपस्थित होते. हा तरुण उंचावर पाण्यात उडी मारण्याचं धडस करणार होता. मात्र त्याला त्याचे मित्र नको करू म्हणून ओरडून सांगत होते. त्यातला एक मित्र व्हिडीओ काढत होता. मात्र कुणाचंही न ऐकता या तरुणानं एक पाऊल मागे जात सूर मारला. पाण्यात उडी मारल्यानंतर त्याचं डोकं दगडावर आदळलं असाव असं सांगितलं जात आहे. टिक टॉक स्टार होण्याऐवजी मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणारा मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

- Advertisement -