Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याभारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम: पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन कायम: पंतप्रधान नरेंद्र मोदी

लॉकडाऊन, नरेंद्र मोदी, PM Modi, Narendra Modi, Lockdown, May 3, Lockdown in India

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ”देशातील अधिकारी आणि नेत्यांसोबत बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच अनेक नागरिकांनीही भारतातील लॉकडाऊन वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता देशातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देश 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत आहे.’

देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘तुम्हा सर्वांच्या त्यागामुळेच भारत आतापर्यंत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच कोरोनाविरोधात भारताची कोरोनाशी लढाई मजबूत आहे. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. एवढचं नाहीतर प्रत्येकाने शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या कर्तव्याचं पालन केलं आहे. अनेकांना खूप त्रास सहन करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हीच खरी आदरांजली आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यातं लॉकडाऊनमध्येच नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. परंतु लोकांनी नियमांचं संयमानं पालन केलं. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,’ असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.

मोदी पुढे बोलताना म्हणाले की, ‘कोरोनाचं वैश्विक संकट आहे त्यामध्ये कोणत्याही देशाशी तुलना करणं योग्य नाही. पण जर जगभरातील मोठ्या देशांतील कोरोनाचे आकडे पाहिले तर त्यांच्या तुलनेत भारत फार चांगल्या परिस्थितीत आहे. महिन्या भरापूर्वी अनेक देश कोरोनाच्या आकड्यांमध्ये भारतासोबत होते. पण आता त्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. भारताने जर वेळीच कठोर निर्णय घेतले नसते तर आज भारताची परिस्थिती काय असती, याची कल्पनाही करवत नाही. सोशल डिस्टंन्सिंग आणि लॉकडाऊनचा फार मोठा फायदा देशाला झाला आहे. आर्थिकरित्या पाहिलं तर देशाला मोठी किमत चुकवावी लागली आहे. पण भारतीयांच्या तुलनेत ती किंमत काहीच नाही.’

‘जगभरातील कोरोनाच्या प्रादूर्भावाची स्थिती आपल्या सर्वांना माहितच आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाला रोखण्याचा कसा प्रयत्न केला याचे आपण साक्षीदार आहात. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 100 होण्याआधीच भारतानं विदेशी नागरिकांना 14 दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे फक्त 550 रूग्ण होते तेव्हाच भारतानं 21 दिवसांचा लॉकडाऊन केला. भारतानं कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची वाट नाही पाहिली. तात्काळ निर्णय घेऊन समस्या थांबवण्याचा प्रयत्न केला.’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

देशातील जनतेला संबोधित करताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, ‘कमी स्त्रोत असताना भारतानं, जो मार्ग निवडला त्याची जगभरात चर्चा होणं स्वभाविक आहे. देशातल्या राज्यांनी व स्थानिक स्वराज्य संस्थांनी अत्यंत चांगलं काम केलं आहे. या सगळ्या प्रयत्नांनंतरही करोना ज्याप्रकारे जसा पसरतोय, त्यानं सगळ्यांना सतर्क केलं आहे. भारतात पण करोनाच्या विरोधात आता लढाई कशी करायची, विजयी कसं व्हायचं, नुकसान कमी कसं होईल, लोकांचे हाल कमी कसे होतील यावर राज्यांबरोबर चर्चा होत आहे. सगळेजण हाच पर्याय देतात की लॉकडाउन वाढवायला हवा. अनेक राज्यांनी लॉकडाउन आधीच वाढवला आहे.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments