Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईVIDEO : लोणीकर तुमची सत्ता गेली पण मस्ती गेली नाही - रूपाली...

VIDEO : लोणीकर तुमची सत्ता गेली पण मस्ती गेली नाही – रूपाली चाकणकर

Rupali Chakankar Babanrao Lonikar,Rupali Chakankar, Babanrao Lonikar,Rupali, Chakankar, Babanrao, Lonikar

मुंबई : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढण्यासाठी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि नाही कुणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत,” असं विधान भाजपचे नेते, माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लोणीकरांना जोरदार इशारा दिला आहे.

जिजाऊ सावित्रींच्या लेकी ह्या हिरोईन आहेतच पण आजुबाजुला तुमच्यासारखे व्हीलन असतील तर तुमचा सुपडा साफ करायला आम्हाला वेळ लागणार नाही. भाजपची सत्ता गेली पण तुमची मस्ती गेली नाही. ही मस्ती आमच्यासारख्या महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी भविष्यात तुमची मसत्ती उतरवण्याच काम निश्चित करतील. त्यामुळं स्त्रिविषयी बोलताना तोंड साभाळून बोला असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा बबनराव लोणीकरांनी दिला आहे.

भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केलेल्या भाषणाची ऑडियो क्लिप सोशल माध्यमातून समोर आली. या भाषणात बोलताना लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा सर्वात मोठा मोर्चा काढण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. विशेष म्हणजे मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी एखादी हिरोईन आणायची असेल तर हिरोईन आणू आणि जर कुणी भेटलं नाही, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्या निवेदन घ्यायला येतील, असं विधान लोणीकरांनी केलं आहे.

काय म्हणाले होते बबनराव लोणीकर

महाराष्ष्ट्र विकास आघाडी सरकारकडून २५ हजार रूपये अनुदान पाहिजे असेल, तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा? सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली, तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा येथे होऊ शकतो. अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर २५ हजार लोकं आणेल, ५० हजार लोकं आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणु, तुम्ही सांगा चंद्रकांत पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचं तुम्हाला वाटलं तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटलं, तर तहसीलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्या निवेदन घ्यायला येतील,” असं लोणीकर भाषणात म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments